Yavatmal : सोनं-नाणं नाही, तर यवतमाळमध्ये चक्क महिलांचे अंतर्वस्त्रे चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड

यवतमाळ शहरातील वडगाव रोड परिसरात मध्यरात्री एका तरुणाने घरात घुसून महिलांची अंतर्वस्त्रे चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Yavatmal : सोनं-नाणं नाही, तर यवतमाळमध्ये चक्क महिलांचे अंतर्वस्त्रे चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड

यवतमाळ शहरातील वडगाव रोड परिसरात मध्यरात्री एका तरुणाने घरात घुसून महिलांची अंतर्वस्त्रे चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या तरुणाने घरात घुसून महिलांची अंतर्वस्त्रे चोरी केल्याची घटना समोर आली असून हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. 

हेही वाचा- Crime News: "तुझी आई होण्याची लायकी ठेवणार नाही" डेटिंग ॲपवरील पार्टनरने 19 वर्षीय तरुणीसोबत ओलांडल्या क्रूरतेच्या सिमा

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे 2 ते 4.30 वाजताच्या सुमारास आर्णी रोडवरील अमृत सेलिब्रेशन परिसरातील एका घराच्या आवारात भिंतीवरून उडी मारून तरुण शिरला. घरातील सर्वजण झोपेत असताना संबंधित चोराने अंधाराचा फायदा घेत घराच्या आवारात वाळत घातलेले कपडे चोरून नेले. वाळत घातलेल्या कपड्यांमधून महिलांची अंतर्वस्त्रे चोरून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.

हेही वाचा- Palghar News : पालघरमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; थेट अमेरिकेच्या नागरिकांना गंडा घातला

जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी संबंधित तरुणाचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयिताची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. या विचित्र आणि संतापजनक प्रकारामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number