जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई मनपात शिवसेनेचा आणखी एक नगरसेवक वाढलाय..6 नगरसेवकांच्या प्रवेशानं 90 झालेली संख्या आणखी वाढलीय.
आता शिवसेनेचे 90 आणि अपक्ष 4 असे एकत्र मिळवून 94 संख्याबळ झालेय. शिवसेनेचे उमेदवार राजू पेडणेकर यांना जोगेश्वरीत नगरसेवक पद मिळालंय.
राजू पेडणेकर यांच्या नगरसेवकपदावर जात प्रमाणपत्रामुळे टांगती तलवार होती..सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानं त्यांना नगरसेवक पद मिळालं.
अपक्ष चंगेश मुलतानी अपात्र ठरल्यानं पेडणेकरांना नगरसेवक पद मिळालंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.