जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र, अद्याप शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासाठी सोमवारी शिवसेनेतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.
दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ही मागणी शिवसेनेतर्फे या आंदोलनात करण्यात येणार आहे. कर्जमाफी संदर्भात सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. दरम्यान शिवसेना नेते मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहेत.
जून महिन्यात शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन 3 महीने होत आहेत तरी देखील अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना पुन्हा एकदा सरकारवर पेटून उठली आहे. सत्तेत असतानादेखील शिवसेना कर्जमाफी मुद्दयावरुन भाजपला वेठीस धरणार आहे. म्हणजेच पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप आमने सामने येणार असंच म्हणावं लागेल.