जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे.
कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची नियोजित यादी जाहीर करण्याची मागणी करत विरोधी पक्षांसह शिवसेनाही सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली.
तिथं चंद्रपुरात सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बैंकेसमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन केले.
यावेळी आमदार बाळू धानोरकरांनी कर्जमाफीची नियोजित यादी जाहीर करण्याचं निवेदन बॅंकेच्या संचालकांकडे दिेले. तसेच ही यादी जाहीरपणे बँकेतही लावण्यात यावी
अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.