शिवसेनेच्या वाट्याचे मंत्रीपद अडवण्याची ताकद चंद्रकांत पाटलांमध्ये नाही; शिवसेना नेत्याचा भाजप आणि नारायण राणेंना टोला

शिवसेनेच्या वाट्याचे मंत्रीपद अडवण्याची ताकद चंद्रकांत पाटलांमध्ये नाही; शिवसेना नेत्याचा भाजप आणि नारायण राणेंना टोला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेचे नेते अरुण दुधवाडकर यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत दुधवाडकर यांनी भाजप आणि राणेंना चांगलाच टोला लगावला.

शिवसेनेच्या वाट्याचे मंत्रीपद अडवण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची ताकद नसल्याची टीका शिवसेनेचे नेते अरूण दुधवाडकर यांनी केलीय.

उद्धव ठाकरेंच्या कोल्हापूर दौऱ्याची महिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर कोल्हापुरातील एकही नेता भाजपच्या गळाला लागणार नसल्याचंही दुधवाडकर यांनी म्हटलंय. भाजप बरोबर त्यांनी राणेंवरही प्रहार केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version