जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी
नाताळच्या चार दिवसाच्या सुट्टीमध्ये अनेक नागरिकांनी शिर्डीमध्ये साईंचं दर्शन घेतलं.
गेल्या 4 दिवसांत 5 कोटी 30 लाखांचं दान साईंचरणी जमा झालंय. 4 लाखभाविकांनी शिर्डीत हजेरी लावली होती. यावेळी साई संस्थानतर्फे मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
साईंचरणी नेमकं किती दान जमा झालंय
– दक्षिणापेटीत 3 कोटी 10 लाखांची रक्कम
– देणगी काऊंटवर 1 कोटी 8 लाखांची रक्कम
– डेबीट, क्रेडीट कार्डवरुन 38 लाखांची रक्कम
– ऑनलाईन देणगीद्वारे 10 लाख 80 हजारांची रक्कम
– चेन डीडीद्वारे 23 लाख 58 हजारांची रक्कम
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.