जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण वाङमय पुरस्कार शरद पवार यांना ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रपर ग्रंथासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राजकीय कारकिर्दीत गेली 50 वर्षे मी फिरतोय असा पुरस्कार मिळाल्यानंतर अनुभव कथनासाठी लिहावे वाटते.
मी जर लिहीत बसलो तर इतर राजकारण्यांना चांगलेच वाटेल. मात्र, बाकीचे राजकीय नेते मला म्हणतील की, आता हेच करीत बस मात्र भविष्यात किती लिहायचे हे मी ठरवून घेईल आणि राजकारणात माझे अस्तित्व पुढेही कायम
ठेवणार असे सूचक संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी औरंगाबाद येथे दिले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.