शरद पवार चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर

  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून म्हणजेच १७ नोव्हेंबरपासून पुढील चार दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार विदर्भ दौऱ्यावर आले आहेत.   महापालिकेच्या आगामी निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने आता निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]

शरद पवार चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर

  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून म्हणजेच १७ नोव्हेंबरपासून पुढील चार दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार विदर्भ दौऱ्यावर आले आहेत.

  महापालिकेच्या आगामी निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने आता निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजपासून पुढील चार दिवस विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो. त्यामुळे या भाजपच्या गडातच शरद पवारांचा चार दिवसांचा दौरा असणार आहे. या दौऱ्यादरम्यान शरद पवार शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तसेच या विदर्भ दौऱ्यात ते वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number