जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नागपुरात शरद पवारांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. बंदी असलेली कीटकनाशकं बाजारात आल्याने अनेक शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत असे शरद पवार यावेळी म्हणाले.
कीटकनाशक फवारणीमुळे झालेल्या मृत्यूंना कृषी मंत्रालय दोषी असल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय. तर कर्जमाफी संदर्भात सरकारला 10 ते15 दिवस वेळ देऊ त्या नंतर त्या संदर्भातील राष्ट्रवादीची दिशा ठरवली जाणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.