मराठा मतांसाठी काका – पुतण्याची पुण्यात भेट, अजेंडा फक्त ‘जय महाराष्ट्र’वर

अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात भेट झाली. मराठा मतांची गोळाबेरीज करण्यासाठी ही भेट झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. आगामी निवडणुकांमध्ये परस्पर शह – काटशहाचे राजकारण करू नये असेही त्यांच्यातील चर्चेत ठरले आहे. सार्वजनिक ठिकाणी बोलताना परस्परांवर टीका टाळायची असाही एक तोंडी करार झाला आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार आणि अजित पवारांविरोधात सुप्रिया […]

मराठा मतांसाठी काका – पुतण्याची पुण्यात भेट, अजेंडा फक्त ‘जय महाराष्ट्र’वर

अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात भेट झाली. मराठा मतांची गोळाबेरीज करण्यासाठी ही भेट झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. आगामी निवडणुकांमध्ये परस्पर शह – काटशहाचे राजकारण करू नये असेही त्यांच्यातील चर्चेत ठरले आहे. सार्वजनिक ठिकाणी बोलताना परस्परांवर टीका टाळायची असाही एक तोंडी करार झाला आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार आणि अजित पवारांविरोधात सुप्रिया सुळे यांनी जाहीरपणे काहीही वक्तव्य करायचे नाही, असा हा करार आहे. या बदल्यात पार्थ अजित पवार यांच्या उमेदवारी विरोधात येणार नाही, अशी ग्वाही शरद पवारांकडून देण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

अजित पवार आणि शरद पवार भेटीचा मूळ अजेंडा
अजित आणि शरद पवारांचे वितुष्ट कुटुंबावर परिणाम करता कामा नये.
निवडणूक परस्पर शह – काटशहाचे राजकारण करू नये.
ताई गटावर सार्वजनिक टीका टाळावी.
सुप्रिया विरोधात अजित पवारांनी बोलू नये.
पार्थच्या उमेदवारीच्या आड थोरले पवार येणार नाहीत

मराठा मतांची राजकारणे

राष्ट्रवादी फुटल्याने मराठा समाज संभ्रमित
मराठ्यांनी कुणाचे नेतृत्व मानायचे यावरून मतमतांतरे
मराठ्यांच्या जुन्या जाणत्यांना शरद पवार प्रिय
तरुण मराठ्यांना अजित पवारांचे आकर्षण
मराठ्यांचे नेतृत्व केवळ पवारांच्या घरातच असावे हीच धडपड
मराठ्यांची मते शिंदेंकडे जाऊ नयेत यासाठी परस्पर संवाद

काका -पुतण्याची पडद्याआडून खेळी

एकनाथ शिंदे यांना रोखण्यासाठी पवार काका -पुतण्याची पडद्याआडून खेळी असू शकते का हा सुद्धा विचार राजकीय पटलावर चर्चेला येत आहेत.
एकनाथ शिंदे मराठा चेहरा म्हणून राज्यात प्रस्थापित होऊ पहात आहेत.
शिंदे यांना भाजपा मतदारांसह मराठ्यांनी स्वीकारल्यास पवार अडचणीत
पवारांना मराठा मतांच्या आधारे हवीय राज्याच्या सत्तेत कायमचा हिस्सा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number