महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींमुळे सर्वत्रच खळबळ माजली आहे. त्यातच अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर त्यांनी लगेचच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, आता राष्ट्रवादीत दोन गट पडले असून दोन्ही गटांमध्ये वार-पलटवार सुरु झाले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन गटात वर्चस्वाची लढाई सुरु झाली आहे. याच पार्श्ववभूमीवर एमईटीमध्ये अजित पवार गटाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत बोलत असताना अजित पवारांनी खळबळजनक अशी वक्तव्य केली आहेत.
काय म्हणाले अजित पवार?
- ‘देशाला करिश्मा असणारे नेतृत्व हवे’
- ‘पंचविशी ते पंचाहत्तरीपर्यंत लोक सक्रिय असतात’
- ‘प्रत्येकाचा काळ असतो’
- ‘शरद पवारांमुळे मुख्यमंत्रीपद नाही’
- ‘दर पंचवीस वर्षांनी पिढी बदलते’
- नितीन गडकरींनी सोबत यायची ऑफर दिली
- ‘२०१४ला भाजपाची ऑफर’
- ‘फडणवीसांचा सरकारसाठी राष्ट्रवादीचे समर्थन’
- ‘शपथविधीला पवारांनीच पाठवलं’
- ‘राष्ट्रवादी – भाजपात २०१७ला युतीची चर्चा’
- ‘भाजपाने शिवसेना सोडायला नकार दिला’
- ‘राष्ट्रवादीने शिवसेनेला सोबत घ्यायला नकार दिला’
- ‘दोन वर्षात शिवसेना मित्र कशी झाली ?’
- ‘शिवसेनेमधल्या अस्वस्थेबद्दल उद्धवना जाणीव’
- ‘आम्हाला भाजपासोबत जायला सांगितलं’
- ‘ऐनवेळी शरद पवारांनी भूमिका फिरवली’
- ‘मलाच मात्र दरवेळी खलनायक ठरवलं’
- ‘तुम्ही कधी थांबणार आहात की नाही?’
- ‘तुम्ही आता आशीर्वाद द्या’
- ‘मी कुणाच्या पोटी जन्मलो ही चूक ?’
- ‘राजीनामा मागेच घ्यायचा होता तर दिला का ?’
- ‘सभा घेतल्यास वस्तुस्थिती लोकांना सांगावी लागेल’
- ‘वरिष्ठांनी आता आराम करा’
- ‘वर्षभरापूर्वीच भाजपात जायचं होतं’
- ‘ठाण्याच्या पट्ठ्यानं पक्षाचं वाटोळं केलं’
- ‘आव्हाडांमुळे अनेक नेते सोडून गेले’