Sleeper Vande Bharat Train: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! देशातील दुसरी ‘स्लीपर वंदे भारत’ लवकरच धावणार ‘या’ मार्गावर

प्रवाशांची मागणी लक्षात घेता, नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेनसाठी काही महत्त्वाचे मार्ग प्रस्तावित आहेत. लांब पल्ल्याचा प्रवास सुसह्य करण्यासाठी रेल्वे या हायस्पीड स्लीपर गाड्यांना प्राधान्य दिले जात आहे.
Sleeper Vande Bharat Train: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!  देशातील दुसरी ‘स्लीपर वंदे भारत’ लवकरच धावणार ‘या’ मार्गावर

Sleeper Vande Bharat Train: भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि आधुनिक करण्यासाठी सातत्याने नवनवीन पावले उचलत आहे. भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणात 'स्लीपर वंदे भारत' ट्रेन एक नवा अध्याय लिहित आहे. हावडा ते कामाख्या या पहिल्या मार्गावरील यशानंतर आता देशातील दुसरी स्लीपर वंदे भारत कधी सुरू होणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. रेल्वे मंत्रालयाने या वर्षाच्या अखेरीस एकूण 12 वंदे भारत स्लीपर गाड्या सुरू करण्याचा मेगा प्लॅन तयार केला असून, मे 2026 पर्यंत आणखी दोन गाड्या रुळांवर येण्याची दाट शक्यता आहे.

उत्पादनाचा वेग वाढणार; 260 ट्रेनसेट्सचे उद्दिष्ट
नवीन ट्रेनच्या डिझाइनचे पहिले काही रॅक्स तयार करण्यास वेळ लागतो, मात्र आता BEML आणि ICF मध्ये याचे उत्पादन वेग घेणार आहे. भारतीय रेल्वेने टप्प्याटप्प्याने एकूण 260 वंदे भारत स्लीपर ट्रेनसेट्स तयार करण्याची मोठी योजना आखली आहे. या गाड्यांची बांधणी बेंगळुरू आणि चेन्नई येथील कोच कारखान्यांमध्ये केली जात आहे. विशेष म्हणजे, मार्च अखेरपर्यंत आणखी दोन ट्रेन संच तयार होण्याची अपेक्षा असून मे महिन्यानंतर ही प्रक्रिया अधिक जलद केली जाईल.

24 कोच आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा
भारतीय रेल्वे आता 24 कोच असलेल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनवर काम करत आहे. या ट्रेनमध्ये विशेष 'पेंट्री कार'ची सुविधा असेल, जी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सोयीची ठरेल. सुरक्षेच्या दृष्टीने या गाड्या "कवच" (Kavach) या स्वदेशी सुरक्षा प्रणालीने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैशिष्ट्यांनी सुसज्ज असतील. ICF मध्ये तयार होणारे 50 रेक्स हे इतर रेक्सपेक्षा वेगळे आणि अधिक प्रगत असतील, ज्यामुळे प्रवाशांना विमान प्रवासासारखा अनुभव मिळेल.

हेही वाचा – Stranded Indians: युद्ध काळात एका आठवड्यात 'इतक्या' भारतीयांची सुरक्षित घरवापसी; परराष्ट्र मंत्रालयाचा 'हा' आकडा वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल

अत्याधुनिक बोल्स्टरलेस कोच आणि वेग
या ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात प्रथमच 'बोल्स्टरलेस' कोचचा वापर करण्यात आला आहे. ही नवीन तंत्रज्ञान प्रणाली ताशी 160 किमी वेगाने धावतानाही ट्रेनला अत्यंत स्थिर ठेवते. यामुळे प्रवाशांना प्रवासात झटके जाणवत नाहीत आणि टेबलवर ठेवलेला चहाचा कप किंवा सामानही हलत नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी यात स्मार्ट सेन्सर लाईट्स बसवण्यात आले आहेत, जे केवळ चालतानाच सुरू होतात, ज्यामुळे ऊर्जेची बचत होते. याशिवाय, बायो-वॅक्युम टॉयलेट्स आणि टच-फ्री नळ यांसारख्या आधुनिक सुविधा स्वच्छता राखण्यास मदत करतील.

या प्रमुख मार्गांवर धावण्याची शक्यता
प्रवाशांची मागणी लक्षात घेता, नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेनसाठी काही महत्त्वाचे मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामध्ये दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकाता, दिल्ली-अमृतसर आणि दिल्ली-श्रीनगर यांसारख्या वर्दळीच्या मार्गांचा समावेश आहे. लांब पल्ल्याचा प्रवास सुसह्य करण्यासाठी रेल्वे या हायस्पीड स्लीपर गाड्यांना प्राधान्य देत आहे. प्रवाशांच्या फीडबॅकनुसार या गाड्यांच्या सेवेत आणि रचनेत आवश्यक ते बदलही केले जात आहेत.

हेही वाचा – 8th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 8 व्या वेतन आयोगाच्या काळातील पहिल्या 'DA'चा मुहूर्त ठरला; होळीनंतर मोठा निर्णय?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version