जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
साता-यातील सुरुची बंगल्यासमोर झालेल्या राडा प्रकरणात आमदार शिवेंद्रराजेंच्या आठ कार्यकर्त्याना जामीन मिळाल्याप्रकरणी दोन्ही राजे समर्थकांनी रुग्णालयातच जल्लोष केला.
जामीन मिळाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रिझन वार्डमध्ये दोन्ही राजे गटाचे समर्थक एकत्र नाचले.
साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि,आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांमध्ये आनेवाडी टोल नाक्यावरुन वाद झाला होता. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी रुग्णालयातच जल्लोष केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.