Vidyanand Bapat, Santosh Chavan : ‘कट रचने, 5-6 गुन्हे दाखल, स्वतःच्याच वडिलांसोबत गंभीर कृत्य’ बापटांवर हल्ला करणारा आरोपी सराईत गुन्हेगार?

बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाण याच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्या संतोष चव्हाण याची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी समोर आली आहे.

Vidyanand Bapat, Santosh Chavan : ‘कट रचने, 5-6 गुन्हे दाखल, स्वतःच्याच वडिलांसोबत गंभीर कृत्य’ बापटांवर हल्ला करणारा आरोपी सराईत गुन्हेगार?

पुण्यात डीजेच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या विद्यानंद बापट यांना एका व्यकीतने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पुण्यात सध्या डीजे वरून वाद पेटलेला पाहायला मिळतो आहे. मारहाण करणाऱ्या संतोष चव्हाणला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर सरकारकडून तातडीची कारवाई करण्यात आली आहे.

विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीची गृह मंत्रालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार विद्यानंद बापट यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे विद्यानंद बापट यांच्यासोबत पोलिस संरक्षण असणार आहे. 

हेही वाचा- Devendra Fadnavis on Vidyanand Bapat : “प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार” बापट यांना मारहाण; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाण याच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्या संतोष चव्हाण याची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी समोर आली आहे. गणेश मंडळाचा कार्यकर्ता असलेला संतोष चव्हाण सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.

राऊतवाडी परिसरात राहणारा संतोष चव्हाण यांच्यावर पुणे शहरात पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तसेच मारामारी करणे, कट रचने यांसारख्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी या आधी देखील त्याला ताब्यात घेतलं होतं. तीन वर्षांपूर्वी संतोष चव्हाणने स्वतःच्याच वडिलांनाही मारहाण केली होती.

तेव्हापासून वडिलांनी त्याच्यासोबतचा संपर्कही तोडला होता. दरम्यान आज सकाळी विद्यानंद बापट यांना मारहाण केल्यानंतर संतोष चव्हाण हनुमान नगर परिसरात येऊन काही मित्रांना भेटून देखील गेला. मात्र, त्यानंतर त्याने आपला फोन बंद केल्याने त्याचा उठाव ठिकाणा लागत नव्हता. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने संतोष चव्हाण याला अटक केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number