‘संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं’ – मोहित कंबोज

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर राज्यात भाजप-सत्ताधारी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्योरोप सुरू झाले. दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेला दुरावा तसेच मुख्यंत्रीपदावरून युतीमध्ये झालेले मतभेद यावरून भाजप नेते मोहित कंबोज यांनी गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, असे म्हणत मोहित कंबोज यांनी ट्विट करत […]

‘संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं’ – मोहित कंबोज

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर राज्यात भाजप-सत्ताधारी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्योरोप सुरू झाले. दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेला दुरावा तसेच मुख्यंत्रीपदावरून युतीमध्ये झालेले मतभेद यावरून भाजप नेते मोहित कंबोज यांनी गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, असे म्हणत मोहित कंबोज यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

मोहित कंबोज ट्विटमध्ये म्हणाले की, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची खोटी गोष्ट संजय राऊतांनी रचली. संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचे होते. महायुती तोडण्याचे काम राऊतांनीच केले. भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतर वाढवण्याचे काम राऊतांनी केले. सकाळी ९ वाजता ट्विट करत राजकारण करायचे काम राऊत करतात.

https://twitter.com/mohitbharatiya_/status/1495579719294619652?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1495579719294619652%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fmumbai%2Fsanjay-raut-wanted-to-be-the-chief-minister-he-was-the-one-who-poured-poison-in-the-alliance-bjp-leader-mohit-kamboj-claims-a301%2F

वाधवान प्रकरणावरूनही मोहित कंबोज यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राऊत साहेब वाधवान यांना कोरोना काळात कुणी पास दिला? त्यांच्यासाठी कुठल्या बंगल्यावरून फोन गेला होता? मागील एक वर्षापासन वाधवान कोणत्या रुग्णालयात आहेत? कोणते नेते त्यांना भेटायला गेले? तुरुंगातील कैदीला पंचतारांकित हॉटेल्समध्ये सुविधा मिळत आहेत. त्यामुळे या सरकारमध्ये कोण मदत करत आहेत? तसेच रुग्णालयाला अय्याशीचा अड्डा कुणी बनवला आहे? असे अनेक सवाल मोहित कंबोज यांनी ट्विट करत उपस्थित केले आहेत.

https://twitter.com/mohitbharatiya_/status/1495590270926155780?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1495590270926155780%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fmumbai%2Fsanjay-raut-wanted-to-be-the-chief-minister-he-was-the-one-who-poured-poison-in-the-alliance-bjp-leader-mohit-kamboj-claims-a301%2F

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number