‘राऊत मुसलमान लिगचे प्रवक्ते’

राज्यात अनेख ठिकाणी तणावग्रस्त परिस्थिती असताना त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. उरुसादरम्यान इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर इतर धर्मियांकडून चादर चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. पोलिसांच्या आणि मंदीर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद आता राजकारणात उमटले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलेलं […]

‘राऊत मुसलमान लिगचे प्रवक्ते’

राज्यात अनेख ठिकाणी तणावग्रस्त परिस्थिती असताना त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. उरुसादरम्यान इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवर इतर धर्मियांकडून चादर चढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. पोलिसांच्या आणि मंदीर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद आता राजकारणात उमटले आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही. सदर घटनेची माहिती घेतली असून कुणीही मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला नसल्याचे मत उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. यावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत मुस्लिम समाजाच्या प्रेमात पडले आहे. त्याचबरोबर राऊत राज्यात अस्थिरता निर्माण करायचं काम करतात. संजय राऊत मुसलमान लिगचे प्रवक्ते आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी राऊतांवर केली आहे.

नितेश राणे म्हणाले, मुसलमान समाजाच्या प्रवक्ते संजय राऊत यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांनी हिंदू संघावर टीका केली आहे. धूप करण्यासाठी लोक जमले होते असे मुसलमान लीगचा प्रवक्ता म्हणून संजय राऊत म्हणाले, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही. उरुसचं धूप देवांना दाखविण्याची प्रथा आहे. त्यांनी मंदिराच्या दाराजवळ जाऊन देवांना धूप दाखविले. सदर घटनेची माहिती घेतली असून कुणीही मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला नसल्याचे मत उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच, महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या नावाने टोळ्या निर्माण करायच्या आणि वातावरण दूषित करायचे असा कट रचण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर प्रकरणाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे वातावरण उद्धवस्त करायचे, नकली हिंदुत्वाच्या नावाने बोंबा मारायच्या असे राज्यात सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number