सांगली महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र समोर आलं आहे. 78 जागांपैकी 66 जागेचा निकाल लागला असून भाजप 5 तर काँग्रेस 7 जागेवर आघाडी वर आहेत.
| भाजप | 41 |
| काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी | 35 |
| अपक्ष | 1 |
| शिवसेना | 0 |
| स्वाभिमानी विकास आघाडी | 1 |
महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षांसह सांगली सुधार समिती, स्वाभिमानी आघाडी, लोकशाही महाआघाडी, अपक्ष महाआघाडी, एमआयएम तसेच अपक्ष असे एकूण 451 उमेदवार रिंगणात होते.