जय महाराष्ट्र न्यूज, ओडिशा
पावसाळ्यात आजार वाढण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. राज्यात अनेक ठिकाणी स्वाईन फ्लूनं थैमान घातले आहे. त्यामुळे आपल्याला स्वाईन
फ्लूची लागण होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन डॉक्टरांकडून सतत केले जाते.
ओडिशामध्ये स्वाइन फ्लू जनजागृती बाबत नवा उपक्रम राबविण्यात आला आहे. प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक हे आपल्या
वाळूशिल्पाच्या माध्यमातून विविध संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. यावेळी सुदर्शन पटनाईक यांनी ओडिशाच्या पुरी बीचवर स्वाईन
फ्लू जनजागृती बाबत वाळूशिल्प साकारले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.