सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर पुन्हा साधला निशाणा; भाजपात वाल्यांची भरती होत असल्याचा लगावला टोला

सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर पुन्हा साधला निशाणा; भाजपात वाल्यांची भरती होत असल्याचा लगावला टोला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीतून भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे.

 

काय म्हंटलय उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये

 

– कर्नाटकसारखं राज्य वेगळय़ा झेंडय़ाची मागणी करतंय. काँग्रेस सोडा हो, पण यावर भाजप तरी खवळून उठलाय का?

– तिथे तुमच्याच दांडक्यांवर स्वतंत्र निशाण फडकतेय. राजकारणातला हा दळभद्री प्रकार थांबणार तरी कधी? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय

– हिंदू म्हणून आम्ही ज्यांचं रक्षण केलं, ज्यांच्यासाठी शिवसैनिकांनी छातीवर वार घेतले, पुन्हा त्यांच्यावर संकट आलं तर काय होईल? असा खडा सवालही त्यांनी

विचारला

– भारतीय जनता पक्षात ‘वाल्यां’ची भरती होत आहे. त्यांचे वाल्मीकी झाले तरी ते राममंदिर उभे करू शकतील काय? असा मार्मिक टोला त्यांनी मारलाय.

– तसेच महाराष्ट्रात शिवसेनेचे स्वबळाचे सरकार नक्कीच येणार आहे असा आत्मविश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version