मुंबई: मंगळवारी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची निर्घृण हत्या केली. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला स्तब्ध केले. पाकिस्तानच्या या नापाक हल्ल्यांमुळे देशातील प्रत्येक नागरिक संताप व्यक्त करत आहे. तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानने देखील या हल्ल्याचा तीव्र निषेध करणारी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये सलमान खानने लिहिले आहे की, ‘दहशतवादी स्वर्गाला नरकात बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.’
पहलगाम हल्ल्यावर सलमान खानची संतप्त प्रतिक्रिया –
सलमान खानने बुधवारी इंस्टाग्रामवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये सलमान खानने लिहिले आहे की, ‘पृथ्वीवरील स्वर्ग मानल्या जाणाऱ्या काश्मीरचे नरकात रूपांतर केले जात आहे. पीडितांच्या कुटुंबियांना माझ्या संवेदना. एका निष्पाप व्यक्तीचाही जीव घेणे म्हणजे संपूर्ण विश्वाचा नाश करण्यासारखे आहे.’ सलमान खानच्या या पोस्टवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलमान खानला पाठिंबा देतानाच त्यांनी पाकिस्तानच्या नापाक हेतूंवरही टीका केली.
Kashmir,heaven on planet earth turning into hell. Innocent people being targeted, my heart goes out to their families . Ek bhi innocent ko marna puri kainath ko marne ke barabar hai — Salman Khan (@BeingSalmanKhan) April 23, 2025
हेही वाचा – योग्य उत्तर देऊ…; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर राजनाथ सिंह यांचे महत्त्वपूर्ण विधान
दहशतवाद्यांनी 26 निष्पाप व्यक्तींचा घेतला जीव –
काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात 26 लोक ठार झाले. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने स्वीकारली आहे. लष्कर-ए-तैयबाने पाकिस्तानमध्ये असा दहशतवादी हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांचे नापाक हेतू स्पष्ट झाले आहेत. भारतही या हल्ल्याला योग्य उत्तर देण्याची तयारी करत आहे. या हल्ल्याची बातमी ऐकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरून परतले आहेत.
हेही वाचा – पहलगाम येथे पोहोचताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी साधला पीडितांशी संवाद
अमित शाहांनी केली घटनास्थळाची पाहणी –
या हल्ल्याची माहिती मिळताच देशाचे गृहमंत्री अमित शाह काश्मीरमध्ये पोहोचले. येथे शाह यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि या हल्ल्याप्रकरणी दुःख व्यक्त केले. दहशतवादी हल्ल्याचा बळी ठरलेल्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. भारतही या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.