काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जामीन मंजूर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई काळवीट शिकार प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सलमानला जोधपूर सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. तब्बल 20 वर्षांनंतर जोधपूर सत्र न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणी सलमानला 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी सलमानला अटक करण्यात आली होती.  सलमाच्या जामीनासाठी त्याच्या वकिलांनी युक्तीवाद सुरु केला होता. अखेर जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानचा […]

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जामीन मंजूर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

काळवीट शिकार प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सलमानला जोधपूर सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. तब्बल 20 वर्षांनंतर जोधपूर सत्र न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणी सलमानला 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी सलमानला अटक करण्यात आली होती. 

salman-bail.png

सलमाच्या जामीनासाठी त्याच्या वकिलांनी युक्तीवाद सुरु केला होता. अखेर जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानचा जामीन संजूर केला आहे. पण, 7 मे रोजी सलमानला कोर्टात हजर राहावं लागणार आहे. सलमानचा जामीन मंजूर झाला असला तरी, त्याला कोर्टाच्या परवानगिशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही. 

जोधपूर सत्र न्यायालयाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सलमानला जामीर देण्यात आला आहे. दोन दिवसांपासून चिंतेत असलेल्या सलमानच्या चाहत्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. सलमानच्या प्रतिक्षेत असलेल्या चाहत्यांनी कोर्टाबाहेरच जल्लोष केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number