मुंबईच्या साकीनाकाजवळ फरसानच्या दुकानाला लागलेल्या आगीत होरपळून 12 जणांचा मृत्यू

मुंबईच्या साकीनाकाजवळ फरसानच्या दुकानाला लागलेल्या आगीत होरपळून 12 जणांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज,  मुंबई

 

मुंबईतील साकीनाका येथे खैराणी रोडवरील फरसानच्या कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत 12 कामगारांचा मृत्यू झाल्याचे समजते.

‘भानु फरसान’ या कारखान्याला पहाटे 4.30 च्या सुमारास ही आग लागली. आगीनंतर दुकानाच्या बाहेर झोपलेले कामगार पळून गेले, मात्र जे कामगार आत झोपले होते, ते आतच राहिले.

त्यातच आग लागल्यानंतर इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे आत अडकलेल्या कामगारांना बाहेर पडणं अवघड झालं.

सध्या आगीवर नियंत्रण मिळालं आहे. मात्र या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version