Sahil Wakode Death Case: साहिल वाकोडे प्रकरणात नवं वळण, ‘माझ्याकडून चूक झाली आहे…’ साहिलचा मैत्रिणीसोबतचा कॉल समोर

IIT विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणात एक नवा पुरावा हाती लागला आहे. आत्महत्येपूर्वी त्याने मैत्रिणीशी फोनवर संवाद साधला होता, त्यात तो म्हणाला होता, ‘माझ्याकडून चूक झाली आहे’. मैत्रिणीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर लगेचच त्याचा मृतदेह आढळल्याने तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसावा. या प्रकरणी संबंधित महिलेची चौकशी सुरू असून, यात जातीयवादाचा कोणताही मुद्दा समोर आलेला […]

Sahil Wakode Death Case: साहिल वाकोडे प्रकरणात नवं वळण, ‘माझ्याकडून चूक झाली आहे…’ साहिलचा मैत्रिणीसोबतचा कॉल समोर

IIT विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणात एक नवा पुरावा हाती लागला आहे. आत्महत्येपूर्वी त्याने मैत्रिणीशी फोनवर संवाद साधला होता, त्यात तो म्हणाला होता, ‘माझ्याकडून चूक झाली आहे’. मैत्रिणीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर लगेचच त्याचा मृतदेह आढळल्याने तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसावा. या प्रकरणी संबंधित महिलेची चौकशी सुरू असून, यात जातीयवादाचा कोणताही मुद्दा समोर आलेला नाही.

नेमकं प्रकरण काय?

18 सप्टेंबरच्या संध्याकाळी IIT बॉम्बेच्या वसतिगृह क्रमांक 4 मधील खोलीत साहिल वाकोडे मृतावस्थेत आढळला. 18 तारखेला दुपारी 4 वाजता परीक्षा देऊन तो वसतिगृहात परतला होता आणि रात्री उशिरा त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. साहिल ‘एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग’मध्ये बी.टेकच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता.

Sahil Wakode Death Case: साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेच्या संचालकांच्या राजीनाम्याची शक्यता; विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य

छळामुळे साहिलने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये आंदोलन पुकारलं. ही 7 महिन्यांतील IIT बॉम्बेतील तिसरी आत्महत्या असून, यंदा देशभरातील IIT मध्ये 9 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number