जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते, साहित्यिक सच्चिदानंद शेवडे यांची जय न्यूजरुम कार्यक्रमात सरळ-स्पष्ट चर्चा.
सच्चिदानंद शेवडे यांच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे
– रामायण, महाभारत, भगवद् गीता यांतून तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळेल
– सावरकरांनी गाय मारा, गाय खा, पार्टी करा असे कधीही सांगीतले नाही
– सावरकरांच्या नावाचा वापर जो तो आपल्या फायद्याप्रमाणे करु पाहत आहे
– शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सर्वाधिक आक्रमक हे कुणीही नाकारु शकत नाही
– काश्मिर आपला आहे आपल्यातचं राहिला पाहिजे अशीच सगळ्यांची भावना असली पाहिजे
– जातीय दृष्टीकोनातून इतिहास सांगीतला जातोय
– प्रत्येक भूगोलाला इतिहास असतो आणि प्रत्येक इतिहासाला भूगोल असतो
– सशस्त्र क्रांतीकारकांचा इतिहास शिकवलाच नाही
– 1947 मध्ये भारताने स्वातंत्र्य मिळवलं, मिळाले नाही
– आपलाच इतिहास आपल्यापर्यंत पोहचवला जात नाही
– मी म्हणेण तो इतिहास… अशी महाराष्ट्राची स्थिती आहे
– कोणत्याही देशाचा इतिहास केवळ शाईने नाही तर रक्ताने लिहीला जातो
– तरुणांमध्ये नाकारात्मकता असल्याने आत्महत्या होतात
– देव मानने वाईट आहे का?
– राष्ट्रगीताप्रमाणे ‘वंदे मारतम’ला मान देणे गरजेचं
– ‘वंदे मातरम’च्या मुद्द्यावरुन राजकारण होतयं
– ‘वंदे मातरम’ चा वाद राजकीय नेते मंडळी निर्माण करत असल्याच्या नागरीकांच्या प्रतिक्रिया