Rohit Pawar On MPSC FDA Paper Leak : MPSC पेपरफुटी प्रकरणात रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ; पेपर किती लाखाला फुटला? ॲडव्हान्स किती? सगळ्यांदेखत दिले सगळे पुरावे

एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षा प्रश्नपत्रिका पेपर फुटी प्रकरणी औषध निरीक्षक भरतीचा पेपर किती लाखाला फुटला? त्याचे ॲडव्हान्स किती देण्यात आले? यासंदर्भात रोहित पवार यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय.

Rohit Pawar On MPSC FDA Paper Leak : MPSC पेपरफुटी प्रकरणात रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ; पेपर किती लाखाला फुटला? ॲडव्हान्स किती? सगळ्यांदेखत दिले सगळे पुरावे

राज्यात पेपरफुटीवरून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नीट पेपरफुटी आणि टीईटी पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच अहिल्यानगरमध्ये एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक बातमी समोर आली. एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षा प्रश्नपत्रिका पेपर फुटी प्रकरणी औषध निरीक्षक भरतीचा पेपर किती लाखाला फुटला? त्याचे ॲडव्हान्स किती देण्यात आले? यासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. यावेळी MPSC अध्यक्षपेपर फुटीत भाजप कार्यकर्त्याचा हात होता असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी म्हटलं की, 'MPSC चे अध्यक्ष कुणाच्या तरी जवळचे आहेत अशी चर्चा आहे, त्यामुळे त्यांना वाटतं असेल की त्यानां कुणी काय बोलणार नाही. 40 लाख देऊन कुणी तलाठी झालं असेल तर तो आधी 40 लाख वसुल करेल आणि नंतर जनतेसाठी काम करेल' असं म्हणत त्यांनी मोठी दावा केला.

हेही वाचा- Ahilyanagar NEET Student : 'माझ्यासाठी खूप त्याग केलात, आता कसला त्रास घेऊ नका', महाराष्ट्रात नीटचा आणखी एक बळी; चिठ्ठी पाहून डोळे पाणावले

रोहित पवार काय म्हणाले?
"आता पेपरफुटीचा महाराष्ट्र झाला आहे. 2026 मध्ये TET, NEET, SRPF, HSC Chem,  2024 मध्ये जलसंधारण हे सगळे पेपर फुटले आहेत. औषध निरीक्षक हा जर पैसे देऊन आणि पेपर विकत घेऊन होणार असेल तर काय होईल? कौटल्य क्लासेसकडे MPSC पेपरचे 90 टक्के प्रश्न आधीच आले होते. 22 मार्चला परीक्षा होती पण 20 मार्चला प्रश्न लीक झाले. 100 पैकी 90 प्रश्न लीक झाले. पेपर सेट करणाऱ्यानेच लीक केला. व्हाट्सअप मेसेजवर लीकचा संशय येऊ नये म्हणुन 10 प्रश्नांचं उत्तरं चुकीचं लिहा असं देखील म्हटलं. एका नायब तहसीलदाराच्या मुला-मुलीला सारखेच मार्क आले. एका पेपरची किंमत 12 लाख आहे. cutoff 112 मार्क्सचा असून देखील 103 मार्क मिळालेल्या मुलाला देखील मुलाखतीला बोलावलं होतं. MPSC उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थि आधीशाळा-कॉलेजसमध्ये नापास झालेले. विद्यार्थ्यांनी MPSC ला तक्रार दिली होती मात्र मुलांना धमकी देण्यात आली. पोलिसांनी अद्याप काहीच केलं नाही. अजितदादांच्या प्रकरणात पोलिसांचा आम्हाला चांगलाच अनुभव आला आहे." 

ऑगस्टपर्यंत सरकारकडे उत्तर देण्यास वेळ
"आयोगाने आणि FDA ने तात्काळ चौकशी करावी आणि FIR दाखल करावी. क्लासेस चालवणाऱ्यांचे CDR आणि WhatsApp चाट्स काढा. गरज पडल्यास CBI कडून तपास करा. 2023 साली अशाच रक्त प्रकरणात विखेपाटील यांनी उलट आमच्यावर गुन्हा दाखल करू असं म्हणाले. फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं मात्र काहीच झालं नाही. MAT चा निकाल आला तेव्हा 62 घोटाळेबाज तलाठी भरती घोटाळ्यात सापडले. ऑगस्टपर्यंत सरकारकडे उत्तर देण्यास वेळ आहे त्यामुळे त्यांनी उत्तरं द्यावं. MAT जर म्हणत असेल घोटळा झाला आहे तर त्यावेळच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे? 2018 मध्ये देखील TET पेपर फुटला होता. त्यावेळी ज्यांचा सहभाग होता त्यांचा आता ही सहभाग असल्याची माहिती. सरकारने थातूरमातूर कायदा आणला होता. पेपर लीक प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात नेलं पाहिजे हे मोदीजी आता म्हणतायत पण हे आम्ही आधी म्हटलं होतं. MPSC चा पेपर लीक होत असेल तर हा मोठा धोका आहे. सध्याचे अध्यक्ष कोण आहे याचा इतिहास काढा." 

हेही वाचा- MPSC Paper Leak : नीटनंतर आता MPSC चा पेपर फुटला! पेपरच्या दोन दिवस आधीच व्हॉट्सॲपद्वारे प्रश्नपत्रिका फिरली? संपूर्ण राज्यात खळबळ

औषध निरक्षक भरतीच्या पेपरफुटी प्रकरणात रोहित पवार ॲक्शन मोडवर 
औषध निरक्षक भरतीच्या पेपरफुटी प्रकरणात रोहित पवार आक्रमक झाले असून ते आज दुपारी दोन वाजता तुकाराम मुंढे यांची भेट घेणार आहेत. तसेच MPSC च्या कार्यालयात देखील भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी साधणार संवाद साधून कारवाईची विनंती करणार आहेत. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी MPSC ला 10 दिवसाचं अल्टीमेटम दिलं आहे. 

नेमकं प्रकरण काय?
एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर आरोप अहिल्यानगरचे ऋषिकेश गांगर्डे यांनी केला आहे. ही परीक्षा 22 मार्च रोजी होणार होती मात्र 20 मार्चलाच प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर फिरल्याचा आरोप ऋषिकेश गांगर्डे यांनी केला. यावेळी व्हॉट्सॲप चॅटिंग चेक केली असताना त्यामध्ये असं म्हटलं होत की, तुम्ही 78 ते 80 प्रश्न लिहा. तर उर्वरित 10 ते 12 प्रश्न चुकीचे लिहा. दोनशेपैकी 90 प्रश्न हे पर्यायासहित अचूक आले होते. दरम्यान या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अहिल्यानगरचे ऋषिकेश गांगर्डे यांनी केली आहे. 
तसेच 154 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली असून 2021 मध्ये ही परीक्षा होणे अपेक्षित होतं, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. 46 हजार जणांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता, तर 31 हजार विद्यार्थ्यांनी हा पेपर दिला होता. एकूण 200 मार्केचा पेपर होता त्यापैकी 180 मार्कचा पेपर फुटल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. परीक्षेला एकूण 100 प्रश्न असतात त्यापैकी 90 प्रश्न 20 मार्च रोजीच अनेक विद्यार्थ्यांना मिळाले असल्याचा आरोप देखील केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number