जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये यंत्रमानवाच्या सहाय्याने एक अनोखी कला साकारण्यात येत आहे. ‘ग्राइंड मास्टर’ या कंपनीने रोबोटच्या साहाय्याने विविध प्रकारचे शिल्प विकसित करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे.
एका जर्मन कंपनीने रोबोटच्या मदतीने मथुरेमध्ये कृष्ण मंदिराच्या बांधकामाचे काम केले होते. हे कोरीव काम पाहिल्यानंतर भारतामध्येही असा प्रयोग करता येईल, या उद्देशाने ‘ग्राइंड मास्टर’ कंपनीने पुतळे बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.