Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडेखोरांचा थरार! टायर पंक्चर करून 18 लाखांची लूट

समृद्धी महामार्गावर सिन्नरजवळ दरोडेखोरांनी धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करून प्रवाशांना लक्ष्य केले. संभाजीनगरच्या कुटुंबाकडून 18 लाखांचा ऐवज लुटल्याप्रकरणी वावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडेखोरांचा थरार! टायर पंक्चर करून 18 लाखांची लूट

नाशिक: समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. सिन्नर तालुक्यातील मलढोण आणि दुशिंगपूर शिवारादरम्यान काही अंतरावर लोखंडी धारदार वस्तू टाकून धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करण्यात आले. त्यानंतर वाहनचालकांना लक्ष्य करत मारहाण आणि लूटमारीचे प्रकार घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांचा शोध सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे पावणेबारा ते दीडच्या दरम्यान चॅनेल क्रमांक 538 ते 543 या पट्ट्यात ही घटना घडली. या काळात तीन वाहनांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Jalgaon: ‘हॅपी रक्षाबंधन ताई… मम्मी-पप्पांना एकटं सोडू नकोस’ स्टेटस ठेवून भावाने रक्षाबंधनाच्या दिवशीच संपवलं जीवन, जळगाव हादरलं

संभाजीनगरच्या कुटुंबाकडून 18 लाखांचा ऐवज लुटला

छत्रपती संभाजीनगर येथील ॲड. श्रीकांत मिश्रा हे आपल्या कुटुंबासह कारने मुंबईच्या दिशेने जात होते. प्रवासादरम्यान त्यांच्या कारच्या टायरला लोखंडी धारदार वस्तू लागल्याने टायर फुटला. त्यांनी वाहन सुरक्षितपणे थांबवताच 10 ते 12 जणांच्या टोळीने कारला घेराव घातल्याचे सांगितले जात आहे. दरोडेखोरांनी लोखंडी रॉड आणि दांडक्यांच्या साहाय्याने मिश्रा यांना मारहाण केली. तसेच वाहनातील लहान मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या परिस्थितीत कुटुंबीयांनी अंगावरील सोन्याचे दागिने, महागडी घड्याळे आणि रोख रक्कम असा एकूण 18 लाख 9 हजार 5 00 रुपयांचा ऐवज दरोडेखोरांच्या ताब्यात दिल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.

आणखी वाहनांनाही बनवले लक्ष्य

याच परिसरात हिंगोलीकडून येणाऱ्या एका वाहनावरही दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एका चालकाने धोका ओळखून वाहन न थांबवता वेग वाढवला आणि तो सुरक्षितपणे पुढे निघून गेला. रात्री सुमारे 1.40 वाजण्याच्या सुमारास नांदेडच्या एका व्यापाऱ्याच्या कारचे टायरही धारदार वस्तूंमुळे फुटले. वाहन थांबताच काही संशयित त्याच्याकडे धावत आल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: Chandwad Accident: चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात! ट्रकने 6 ते 7 वाहनांना चिरडलं; 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू

हवेत गोळीबार झाल्याने आरोपी पसार

प्राथमिक माहितीनुसार, व्यापाऱ्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर होती. धोका ओळखत त्यांनी हवेत दोन गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज होताच संशयित महामार्गाच्या बाजूने पळून गेल्याची चर्चा आहे. या घटनेची पोलिसांकडून स्वतंत्र पडताळणी सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number