जय महाराष्ट्र न्यूज, विरार
विरारमध्ये रिक्षाचालकानं बसचालकाला मारहाण केली. महापालिका परिवहन सेवेच्या चालकाला रिक्षा चालकानं लाथा बुक्क्यांनी मारलं.
तर कंडक्टरकडून तिकीट मशीन घेत दीड हजारही लंपास केले. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली.
दुपारी 4 वाजेपर्यंत मुजोर रिक्षाचालकावर कारवाई झाली नाही तर श्रमजीवी संघटना आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.