Badshah Weds Isha Rikhi : बादशाहने उरकले दुसरे लग्न? पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबतचे फोटो व्हायरल

बादशाहचे पहिले लग्न जॅस्मिन मसीह सोबत झाले होते, परंतु 2020 मध्ये ते दोघे वेगळे झाले. आता ईशा रिखीच्या रूपाने बादशाहच्या आयुष्यात नवीन जोडीदार आल्याने त्याचे चाहते या नवीन सुरुवातीबद्दल आनंदित आहेत.
Badshah Weds Isha Rikhi : बादशाहने उरकले दुसरे लग्न? पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबतचे फोटो व्हायरल

Badshah Weds Isha Rikhi : प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह (Badshah) पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकल्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी (Isha Rikhi) हिच्यासोबत त्याचे लग्न झाल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. ईशाची आई पूनम रिखी यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये बादशाह तपकिरी कुर्ता आणि सोनेरी रंगाची पगडी घातलेली दिसत आहे. तर, ईशा लाल रंगाच्या सलवार कमीजमध्ये अतिशय सुंदर दिसत असून दोघांनी एकमेकांना हार घातले आहेत.

कोण आहे ईशा रिखी?
ईशा रिखी ही एक लोकप्रिय पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने 2013 मध्ये ‘जट बॉईज पुत जट्टां दे’ या चित्रपटातून पंजाबी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर 2018 मध्ये ‘नवाबजादे’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्येही पाऊल ठेवले. गेल्या काही वर्षांपासून ईशा पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक ओळखीचा चेहरा बनली आहे. ग्लॅमरच्या जगात असूनही ईशाने आपले वैयक्तिक आयुष्य नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात येण्यापासून वाचवले असून ती अत्यंत साधेपणाने राहणे पसंत करते, असे तिच्या जवळचे लोक सांगतात.

हेही वाचा – Nora Fatehi Song Controvercy: नोरा फतेहीवर ‘वर्क परमिट’चा गैरफायदा घेतल्याचा आरोप; 10 वकिलांची टीम सरसावली, अभिनेत्रीची भारतातून होणार हकालपट्टी?

चार वर्षांपासून नाते ठेवले होते गुप्त
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बादशाह आणि ईशा रिखी गेल्या 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एका पार्टीत कॉमन मित्रांच्या माध्यमातून त्यांची भेट झाली होती आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. विशेष म्हणजे, या दोघांनीही आपले नाते सोशल मीडिया किंवा सार्वजनिक कार्यक्रमांपासून पूर्णपणे दूर ठेवले होते. आता लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांना या लग्नाची गुप्त बातमी मिळाली आहे आणि त्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, असे असले तरी, अद्याप या जोडीने अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

बादशाहचे पहिले लग्न आणि वैयक्तिक आयुष्य
बादशाहचे पहिले लग्न जॅस्मिन मसीह सोबत झाले होते, परंतु 2020 मध्ये ते दोघे वेगळे झाले. त्यांना जेसेमी ग्रेस मसीह सिंग नावाची एक मुलगी असून ती सध्या लंडनमध्ये राहते. एका पॉडकास्टमध्ये बादशाहने आपल्या पहिल्या लग्नाबद्दल बोलताना सांगितले होते की, ते नाते त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी चांगले नव्हते, म्हणून त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता ईशा रिखीच्या रूपाने बादशाहच्या आयुष्यात नवीन जोडीदार आल्याने त्याचे चाहते या नवीन सुरुवातीबद्दल आनंद व्यक्त करत आहेत.

हेही वाचा – Rajinikanth on Dhurandhar 2 : ‘धुरंधर 2’ ची थलायवालाही भुरळ! सोशल मिडियावर पोस्ट करत केलं कौतुक, म्हणाले, ‘बॉक्स ऑफिसचा बाप…’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version