छत्रपती शिवाजी महाराज असते तर… – राजू शेट्टी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मंत्र्यालयात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची राजू शेट्टी यांनी मुंबईच्या जेजे रुग्णालयात जाऊन  भेट घेतली. धर्मा पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. यावेळी  सरकारी अवस्था, भ्रष्टाचार, दलाली याचे हे उत्तम उदाहरण आहे. तसेच, दलालीमार्फत नुकसान भरपाई मागणारा शेतकरी कोट्यधीश होतो, इतर शेतक-यांची मात्र फरफट होते. छत्रपती शिवाजी महाराज असते तर या […]

छत्रपती शिवाजी महाराज असते तर… – राजू शेट्टी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मंत्र्यालयात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची राजू शेट्टी यांनी मुंबईच्या जेजे रुग्णालयात जाऊन  भेट घेतली. धर्मा पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. यावेळी  सरकारी अवस्था, भ्रष्टाचार, दलाली याचे हे उत्तम उदाहरण आहे. तसेच, दलालीमार्फत नुकसान भरपाई मागणारा शेतकरी कोट्यधीश होतो, इतर शेतक-यांची मात्र फरफट होते. छत्रपती शिवाजी महाराज असते तर या सरकारचा कडेलोट केला असता. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी म्हटले. तसेच, संबंधित दोषी अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

तसेच, विरोधी पक्षनेते राधकृष्ण विखे पाटील यांनीदेखील जे.जे. रूग्णालयात जाऊन धर्मा पाटील यांची भेट घेतली.  ही घटना वेदनादायक. तेथील मंत्र्यांना खातेफोड करुन मिळते परंतु शेतकऱ्यांचे नाही. तुम्ही आत्महत्या करा मग आम्ही शेतकऱ्यांना मदत करू, असे सरकारचे धोरण आहे. असे राधकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी म्हटले.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number