रजनीश सेठ महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक पदी कायमस्वरूपी पोलीस महासंचालकांची नियुक्ती करावी, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक मिळाले आहेत. संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. यावरून उच्च न्यायालयाने सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे अखेर रजनीश […]

रजनीश सेठ महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक पदी कायमस्वरूपी पोलीस महासंचालकांची नियुक्ती करावी, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक मिळाले आहेत.

संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. यावरून उच्च न्यायालयाने सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे अखेर रजनीश सेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रजनीश सेठ हे १९८८चे आयपीएस अधिकारी आहेत. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश सेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त होते. तसेच रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिले आहेत.

मात्र, रजनीश सेठ यांच्या नियुक्तीमुळे राज्य पोलीस महासंचलकाच्या नेमणूकीत वरिष्ठता डावल्याचा नवा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संजय पांडे यांची वरिष्ठता डावलल्याचा वाद होण्याची शक्यता आहे. संजय पांडे महाराष्ट्र सुरक्षा महामंडळळाच्या महासंचालकपदी कार्यरत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number