वृत्तसंस्था, नवी दिल्ली
एटीममधून पैशांची चोरी होण्याच्या बऱ्याच घटना आपण बघितल्या आहेत. पण राजस्थानमध्ये तर चक्क एटीएमच चोरुन नेल्याची घटना घडलीये.
राजस्थानमधील बोंडी नैनिवा परिसरात 4 जणांनी मिळून एटीएम मशीन चोरून नेलीये. ही संपुर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्यात 4 जण सेंट्रल बैंक ऑफ इंडिया चं एटिएम चोरून नेत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय.
एटीएम मशिनची चोरी झाली तेव्हा मशिनमध्ये 5 लाख रुपयांची कॅश असल्याचीही माहिती मिळतेय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.