शिवसनेने नगरसेवक फोडून नीच राजकारण केलेय; उद्धव ठाकरेंची खेळी राज ठाकरेंच्या जिव्हारी

शिवसनेने नगरसेवक फोडून नीच राजकारण केलेय; उद्धव ठाकरेंची खेळी राज ठाकरेंच्या जिव्हारी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवक शिवसेनेनं फोडल्यामुळं दुखावलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत हल्ला चढवलाय. शिवसेनेने पाच- पाच कोटी रुपये देऊन नगरसेवक फोडले  घाणाघाती आरोपही राज ठाकरेंनी शिवसेनेवर केला

नगरसेवक फोडून उद्धवने नीच राजकारण केलंय. मी हे कधीच विसरणार नाही आणि विसरलो नाही हे भविष्यात दिसेल असा स्पष्ट इशारा राज ठाकरेंनी दिलाय.

यापुढं हातावर नाही फक्त गालावर टाळी दिली जाईल, असं सांगत राज यांनी शिवसेनेविरोधात संघर्षाचा शंखच फुंकलाय. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version