मोदी सूतकताई करताना…व्यंगचित्रातून राज ठाकरेंचा मोदींना टोला

महात्मा गांधी जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक कार्टून काढलं असून या कार्टूनमध्ये राज ठाकरे यांनी आपल्या खास व्यंगशैलीतून मोदींवर कुंचल्याच्या साहाय्याने फटकारे मारले आहेत… राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपाध्यक्ष अमित शहांना लक्ष्य केलं आहे. राज यांनी एकप्रकारे मोदींवर टीका करताना, कापडापासून सूत बनविणारे महात्मा मोदी, असेच चित्र रेखाटले आहे. […]

मोदी सूतकताई करताना…व्यंगचित्रातून राज ठाकरेंचा मोदींना टोला

महात्मा गांधी जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक कार्टून काढलं असून या कार्टूनमध्ये राज ठाकरे यांनी आपल्या खास व्यंगशैलीतून मोदींवर कुंचल्याच्या साहाय्याने फटकारे मारले आहेत…

राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपाध्यक्ष अमित शहांना लक्ष्य केलं आहे. राज यांनी एकप्रकारे मोदींवर टीका करताना, कापडापासून सूत बनविणारे महात्मा मोदी, असेच चित्र रेखाटले आहे.

विशेष म्हणजे गांधीजींच्या वेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी चरखा चालवताना दिसत आहेत. भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या अंगावरील कपडे काढून हे सूत बनविण्यात येत असून देशाची अर्थव्यवस्था आणि विचारवादाचा उडालेला गोंधळ मोदी कचऱ्याच्या ढिगासारखा गुंडाळात आहेत आणि विशेष म्हणजे भिंतीवर अडकवलेल्या छायाचित्रातून महात्मा गांधी आश्चर्यपणे मोदींकडे पाहत असल्याचे राज यांनी व्यंगचित्रातून सूचवले आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number