Maharashtra Weather Update : कुठे कोरडे तर कुठे ढगाळ; जाणून घ्या कसे असेल राज्यातील आजचे तापमान

मुंबई : महाराष्ट्रातील बहुतांश भागांत सध्या पावसाने दडी मारली असून उन्हाचा कडाका जाणवतं आहे. काही भागांत पावसाची उघडीप कायम असली, तरी वातावरणात ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळत आहे. आज, गुरुवारी हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहून […]

Maharashtra Weather Update : कुठे कोरडे तर कुठे ढगाळ; जाणून घ्या कसे असेल राज्यातील आजचे तापमान

मुंबई : महाराष्ट्रातील बहुतांश भागांत सध्या पावसाने दडी मारली असून उन्हाचा कडाका जाणवतं आहे. काही भागांत पावसाची उघडीप कायम असली, तरी वातावरणात ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळत आहे. आज, गुरुवारी हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहून तुरळक ठिकाणीच हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

सध्या कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असून ही प्रणाली दिसा, जयपूर, आग्रा, लखनऊ, गया, सागर बेटे ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. याशिवाय आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि रायलसीमा परिसरावर समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून दक्षिण कर्नाटक ते मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाच्या क्षेत्राचे संकेत मिळाले आहेत. उत्तर थायलंड आणि लगतच्या भागात समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रभावामुळे उत्तर अंदमान समुद्रात शनिवारपर्यंत नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ते ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे येताना अधिक तीव्र होईल. 

हेही वाचा : Manoj Jarange Patil : महत्त्वाची बातमी! जरांगेंचं सरकारला अल्टिमेटम, 3 महिन्यांची मुदतवाढ; अन्यथा उपोषण नाही, थेट मुंबई काठणार

राज्यात कसे असेल  वातावरण 

कोकणातील पालघर, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. नाशिक घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज असून अहिल्यानगर जिल्ह्याला विजांसह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असून कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा व सातारा घाटमाथ्यावर हलक्या सरी तर पुणे घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर मराठवाडा आणि विदर्भमधील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. मात्र बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number