जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सलग 22 वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान मोदींसाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
तर, लवकरच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या राहुल गांधींसाठीही गुजरातची लढाई ही सोपी नाही.
या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मतदारांना आवाहन केलंय. राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मतदारांना शुभेच्छा दिल्यात.
तर, यामध्ये राहुल गांधींनी युवापिढीला खास शुभेच्छा देत, मोठ्या संख्येने मतदान करा आणि लोकशाहीला महत्व द्या असे देखील म्हटले आहे.