श्रीनगर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकार पाकिस्तान विरोध जी काही कारवाई करेल, त्याला आपला पाठींबा असेल, असं म्हटलं आहे. यासंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘मला वाटते की आपण सर्वांनी एकत्र उभे राहणे, एकजूट राहणे आणि या घृणास्पद कृत्याचा सामना करणे आणि दहशतवादाला कायमचे पराभूत करणे खूप महत्वाचे आहे.’
काँग्रेस पक्षाचा मोदी सरकारला पाठींबा –
राहुल गांधी यांनी म्हटलं की, ‘मी मुख्यमंत्री आणि उपराज्यपालांनाही भेटलो आणि त्यांनी मला घडलेल्या घटनेची माहिती दिली. मी दोघांनाही आश्वासन दिले की माझा पक्ष आणि मी त्यांना पूर्णपणे पाठिंबा देणार आहोत. मी इथे काय चालले आहे ते जाणून घेण्यासाठी आणि मदत करण्यासाठी आलो आहे. जम्मू आणि काश्मीरमधील सर्व लोकांनी या भयानक कृत्याचा निषेध केला आहे. मी जखमींपैकी एकाला भेटलो आहे. माझे प्रेम आणि आपुलकी त्या सर्वांप्रती आहे ज्यांनी आपले कुटुंबीय गमावले आहेत.’
नेता विपक्ष श्री @RahulGandhi ने पहलगाम हमले में घायल हुए लोगों और पीड़ित परिवारों से मुलाकात की। पहलगाम में हुई आतंकी घटना मानवता पर प्रहार है, मोहब्बत और भाईचारे को मिटाने की एक शर्मनाक कोशिश है। आतंक के खिलाफ हम सभी एकजुट हैं। हमें साथ मिलकर इन नफरती ताकतों को करारा जवाब… pic.twitter.com/inPUQVBfrp — Congress (@INCIndia) April 25, 2025
हेही वाचा – ‘पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि परत पाठवा’; अमित शाहांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश
पहलगाम में हुआ दुस्साहसी आतंकी हमला एक भयावह त्रासदी है। मैं यहां के हालात को समझने और मदद करने आया हूं। जम्मू-कश्मीर के सभी लोगों ने इस भयावह हमले की निंदा की है और पूरी तरह से देश का समर्थन किया है। मैंने घायल हुए एक व्यक्ति से मुलाक़ात की। जिन लोगों ने अपने परिजनों को खोया… pic.twitter.com/wjqhsRjnx2 — Rahul Gandhi (@RahulGandhi) April 25, 2025
सरकारच्या पाकिस्ताविरोधी कारवाईला आमचा पाठिंबा – राहुल गांधी
दरम्यान, राहुल गांधी यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘काल आमची सरकारसोबत बैठक झाली आणि संयुक्त विरोधी पक्षाने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. तसेच मोदी सरकारला पाकिस्तानविरोधात कोणतीही कारवाई करायची असेल तर आम्ही त्यांचे समर्थन करू. जे काही घडले आहे त्यामागे समाजात फूट पाडणे आणि भावाला भावाशी लढायला लावणे हाच हेतू आहे. दहशतवाद्यांचा पराभव करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने एकत्र उभे राहणे खूप महत्वाचे आहे.’
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.