लाेकसभेत घडली एेतिहासिक घटना,आधी हल्ला मग गळाभेट…

वृत्तसंस्था, दिल्ली मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवल्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींजवळ जात त्यांना चक्क मिठी मारली आणि सगळेच चकीत झाले.  मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताववर लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली. राहुल गांधी यांनी राफेल विमान करार, बेरोजगारी आणि जीएसटीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधींच्या आरोपामुळे सत्ताधार्‍यांनी प्रचंड गदारोळ केला. चर्चेच्या आधी पंतप्रधान नरेंद्र […]

लाेकसभेत घडली एेतिहासिक घटना,आधी हल्ला मग गळाभेट…

वृत्तसंस्था, दिल्ली

मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवल्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींजवळ जात त्यांना चक्क मिठी मारली आणि सगळेच चकीत झाले. 

मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताववर लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली. राहुल गांधी यांनी राफेल विमान करार, बेरोजगारी आणि जीएसटीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधींच्या आरोपामुळे सत्ताधार्‍यांनी प्रचंड गदारोळ केला.

चर्चेच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले, ”आज आपल्या संसदीय लोकशाहीचा महत्त्वाचा दिवस आहे. मला सहकारी खासदारांवर विश्वास आहे की, ते या निमित्ताने पुढे येऊन कुठल्याही अडथळ्याविना सकारात्मक आणि विस्तृत चर्चा पुढे नेतील. आम्ही देशाची जनता आणि संविधान निर्मात्यांचे ऋणी आहोत. पूर्ण देशाच्या नजरा आपल्यावर राहतील.”

राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान ‘पप्पू’वरून मोदींवर पलटवार केला. “भाजपसाठी मी पप्पू आहे परंतु माझ्या मनात द्वेष नाही. भाजप आणि संघाने मला भारतीय, हिंदू असल्याचा अर्थ समजावून सांगितला, मी त्यांचा आभारी आहे.” भाषणानंतर राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली. मोदींनीही राहुल गांधींसोबत हस्तांदोलन केले.

राहुल गांधी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे…

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या पंतप्रधानांसोबत झोपाळ्यावर झोके घेत असताना चिनी सैनिकांनी भारताच्या क्षेत्रात घुसखोरी केली होती, असा घणाघाती आरोप 
  • सरकारच्या जुलुमांचा शिकार देशातील शेतकरी ठरत आहे. नरेंद्र मोदी माझ्या नजरेस नजर मिळवू शकत नाहीत
  • मोदींच्या दबावात येथून संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाला खोटे सांगितले.
  • देशभरात महिला, दलितांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. महिला संरक्षणात मोदी सरकारचे अपयशी ठरले आहेत. देशात अत्याचारासोबतच दडपशाहीही वाढली आहे.
  • नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही जोडी सत्तेशिवाय राहू शकत नाही. देशाचे संविधान, लोकशाहीवर हल्ला केला जात आहे.
  • देशाच्या इतिहासात प्रथमच देश महिलांसाठी असुरक्षित असल्याचे म्हटले गेले आहे.
  • अल्पसंख्याक, दलित, आदिवासी, मागासवर्गीय, महिलांवर हल्ले होत आहेत. त्या प्रकारावर पंतप्रधान ‘ब्र’ सुद्ध काढत नाही. उलट त्यांचे मंत्री हल्लेखोरांच्या गळ्यात हार घालून त्यांच्या निंदनिय कृत्याचे जाहीर समर्थन करतात.
  • राफेल विमान खरेदी करारावरून राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर कडाडून हल्लाबोल केला. युपीए सरकारच्या काळातील किमतीत भाजप सरकारने भरमसाठ वाढ करून आपल्या कॉर्पोरेट मित्रांना फायदा करून दिल्याचा आरोपीही राहुल गांधी यांनी केला.
  • शेतकर्‍यांचा मुद्दा उपस्थित करून राहुल गांधी म्हणाले, देशातील शेतकर्‍यांनी पंतप्रधानांना मतदान करून जिंकून दिले. पंतप्रधानांनी शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याऐवजी उद्योगपतींचे कर्जे माफ केली. शेतकरी मात्र ओरडचत राहिले.
  • भाषणाच्या शेवटी भाजप, राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) आभार मानले. राहुल म्हणाले, मी संघ आणि भाजपचा आभारी आहे. त्यांच्यामुळे मला काँग्रेस काय आहे, हिंदू असल्याचा अर्थ समजून घेता आहे.

नरेंद्र मोदींच्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number