वृत्तसंस्था, नवी दिल्ली
स्पेनच्या राफेल नदालने दक्षिण आफिक्रेच्या केविन अँडरसनवर मात करत अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर तिसऱ्यांदा आपलं नाव कोरले आहे.
ग्रँडस्लॅम पुरुष एकेरीत नदालने केविन अँडरसनवर 6-3, 6-3, 6-4 अशी सरळ सेट्समध्ये मात करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत आपली जादू कायम ठेवली.
2013 नंतर राफेल नदालचे हे एकाच वर्षातील दुसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. राफेल नदालचं कारकीर्दीतील आतापर्यंतच सोळावं ग्रँडस्लॅम विजेतेपदं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.