जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी
पुणतांब्यात शेतकरी आंदोलन तीव्र झालं आहे. संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावर संपकरी शेतकरी ठाम आहेत. शेतकऱ्यांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.
तसंच ग्रामपंचायतीसमोर मोठ्या संख्येने जमा होत सरकारविरोधात घोषणाबाजीसुद्धा केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या जमावाने पुणतांबा पोस्ट ऑफिसला टाळे ठोकत सरकारी अनास्थेचा निषेध केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.