जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
श्रावण सुरु होताच सर्वांना वेध लागतात ते म्हणजे गणपतीचे आणि विविध विक्रम करण्याची शर्यत सुरु होते. पुण्यातही असाच एक विक्रम घडला.
एकाचवेळी तब्बल एकवीसशे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचा विक्रम पुण्यातील रमणबाग शाळेच्या विद्यार्थांनी केला.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य द्यावं, यासाठी या स्तुत्य उपक्रमाचं आयोजन करण्यात आले.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या गणेशमूर्ती गणेशोत्सव काळात घरी बसवण्यात येणार आहेत.
प्रत्येक विद्यार्थी आपला बाप्पा कसा आकर्षक आणि सुबक होईल, याकडे बारकाईने लक्ष देत होता. त्यामुळे आकर्षक मूर्ती बनवण्याची जणूकाही स्पर्धाच यावेळी
लागली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.