Pune: पुणेकरांनो, आज घराबाहेर पडताना सावधान! तिरंगा रॅलीमुळे फर्ग्युसन रोडसह ‘या’ मार्गांवर वाहतूक बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुण्यात तिरंगा रॅलीमुळे आज दुपारी 2 वाजल्यापासून फर्ग्युसन रस्त्यासह काही मार्गांवर वाहतूक बदलणार आहे. वाहनचालकांनी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा.

Pune: पुणेकरांनो, आज  घराबाहेर पडताना सावधान! तिरंगा रॅलीमुळे फर्ग्युसन रोडसह ‘या’ मार्गांवर वाहतूक बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरात आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर आज फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी काही मार्गांवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आज दुपारी 2 वाजल्यापासून रॅलीच्या मार्गावरील वाहतूक बंद किंवा वळवण्यात येणार आहे. त्यामुळे फर्ग्युसन रस्ता तसेच आसपासच्या प्रमुख मार्गांवर वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

असा असेल तिरंगा रॅलीचा मार्ग

तिरंगा रॅलीची सुरुवात ललित महल हॉटेल चौकातून होणार असून पुढे ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, गुडलक चौक आणि त्यानंतर गर्वारे चौक असा रॅलीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. रॅलीदरम्यान या मार्गावर मोठ्या प्रमाणात नागरिक आणि वाहने जमा होण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना आधीच पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: Thane News: चिंता मिटली! ठाणेकरांची तहान भागवणारे बारवी धरण 100 टक्के भरले; पाण्याचा विसर्ग सुरू

वाहनचालकांसाठी कोणते पर्यायी मार्ग?

खंडोजीबाबा चौक ते गर्वारे चौक या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी विविध पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्वारगेटकडून पुणे विद्यापीठाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी अलका चौक, खंडोजीबाबा चौक, वीर सावरकर चौक, आण्णाभाऊ साठे चौक, ना. सी. फडके चौक, मंगीरबाबा चौक, सेनादत्त चौक, बालशिवाजी, म्हात्रे पूल, नळ स्टॉप आणि त्यानंतर लॉ कॉलेज रोडचा वापर करावा. स्वारगेटकडून खडकी किंवा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी आण्णाभाऊ साठे चौक, पूरम चौक, बाजीराव रोड, गाडगीळ पुतळा, कुंभार वेस आणि आरटीओ चौक असा पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे. खंडोजीबाबा चौकाकडे येणाऱ्या वाहनांनी नळ स्टॉप, पौड फाटा, आंबवले चौक आणि लॉ कॉलेज रोडचा मार्ग स्वीकारावा.

इतर मार्गांवरही वाहतूक बदल

अलका टॉकीज चौकाकडून येणाऱ्या वाहनांनी केळकर रस्ता, नदीपात्र, शनिवारवाडा आणि गाडगीळ पुतळा या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सेनादत्त चौकाकडून येणाऱ्या वाहनांनी बालशिवाजीमार्गे म्हात्रे पुलाचा वापर करावा. शामराव गंजवे चौकाकडून येणाऱ्या वाहनांसाठी पत्रकार भवन, एस. एम. जोशी पूल आणि गर्वारे कॉलेज हा मार्ग सुचवण्यात आला आहे. तर सेवासदन चौकाकडून येणाऱ्या वाहनांनी आप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, गाडगीळ पुतळा, कुंभार वेस आणि आरटीओ चौक या मार्गाने पुढे जावे.

हेही वाचा: Festival Holiday : सरकारचा जीआर जारी! आता दहीहंडीला नाही, तर रक्षाबंधनला मिळणार सुट्टी; तारखा बघून ठेवा

गर्वारे चौक ते चाफेकर चौक मार्गावरही बदल

गर्वारे चौक ते चाफेकर चौक या मार्गावरील वाहतुकीतही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. या मार्गासाठी शेलारमामा चौक, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, एस. बी. रोड आणि विद्यापीठ चौक हा पर्यायी मार्ग वापरता येणार आहे.दुसऱ्या पर्यायामध्ये भांडारकर रोड, बीएमसीसी रोड, चतु:शृंगी रोड, मॉडर्न कॉलनी रोड, लॉ कॉलेज रोड आणि सेनापती बापट मार्गाचा वापर करता येईल.त्यामुळे आज फर्ग्युसन रोड आणि परिसरात प्रवास करणाऱ्या पुणेकरांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीतील बदल लक्षात घ्यावेत आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number