Pune : पुण्यात MPSC ची तयारी करत होता,हळूहळू तिच्यासोबत कॉलवर बोलण सुरु झालं अन् तिथचं घात झाला ; मध्यरात्रीच तरुणासोबत..; महाराष्ट्र हादरला

विद्यचे माहेरघर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. महाराष्ट्र नाही तर अनेक राज्यातील विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येत असतात. मुख्यत: एमपीएससीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते.मात्र, गेल्या काही व

Pune : पुण्यात MPSC ची तयारी करत होता,हळूहळू तिच्यासोबत कॉलवर बोलण सुरु झालं अन् तिथचं घात झाला ; मध्यरात्रीच तरुणासोबत..; महाराष्ट्र हादरला

विद्यचे माहेरघर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. महाराष्ट्र नाही तर अनेक राज्यातील विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येत असतात. मुख्यत: एमपीएससीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते.मात्र, गेल्या काही वर्षभरापासून एमपीएसी करणाऱ्या विद्यार्थ्यांसंबंधित गुन्हेगारीच्या घटना पुण्यातून समोर येत आहेत. पुन्हा एकदा अशीच धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.

नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार,प्रसाद सूर्यवंशी असे पीडित तरुणाचे नाव असून तो पुण्यात राहून एसपीएसची परीक्षेची तयारी करतो. प्रसादचा दररोजचा दिवस अभ्यासात जात होता. सर्वकाही सुरळीत असताना,सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो पुण्यातील चिमण्या मारूती चौक परिरात गेला होता. याच वेळी अचानक प्रसादजवळ एक चारचारी गाडी आली आणि त्याच गाडीतून आरोपी आले आणि सर्व थरारार सुरु होतो.

Chhatrapati Sambhajinagar : हसतं-खेळतं कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झालं! आईने काळजावर दगड ठेवून 5 दिवस लपवलं लेकाच्या मृत्यूचं धक्कादायक सत्य; नेमकं प्रकरण काय?

मध्यरात्री तरुणावर आलं संकट
प्रसाद जवळ गाडी येते आणि त्यातून काही जवळ उतरतात. त्यानंतर त्याच्याजवळ जात,''तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतोस''असा जाब विचारला आणि प्रसादचे
कोणताही बोलणे ऐकून न घेता थेट त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. धक्कादायक म्हणजे त्याला काही समजण्याच्या आतच बळजबरीने त्याला गाडीत घेचून घटनास्थळावरुन पसार झाले.

 पोलिसांची कारवाई
प्रसादसोबत घडलेल्या प्रकाराची माहिती ही विश्रामबाग पोलिसांना मिळाली आणि त्यांनी तातडीने तपास सुरु केला. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काहीतासांतच अपहरण झालेल्या विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका केली असून दोन आरोपींना बेड्या
ठोकल्या आहेत.

Govandi: गोवंडीत माथेफिरू 'कॅट-किलर'चा वावर? 3 दिवसांत 6 मांजरी संपवल्या, नेमकं प्रकरण काय?

तिझ्यासोबत कॉलवर बोलण पडलं महागात
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद सोबत अजून एक तरुणी होती. जी पुण्यात राहून एमपीएससीची तयारी करत होती. हीच तरुणी पीडित तरुण प्रसाद सुर्यवंशी आणि मुख्य आरोपी यादोघांशीही फोनवर सतत बोलत होती. हीच गोष्ट आरोपी तरुणाच्या लक्षात आली आणि प्रसाद विरोधात तरुणाच्या मनात तीव्र राग निर्माण झाला. आपल्या मैत्रिणीचे दुसऱ्या मुलाशी बोलणे सहन न झाले आणि ओरापीने स्वत:च्या मित्राला सोबत घेतले आणि थेट पुणे गाठत अपहरणाचा कट रचला.

कशी केली सुटका?
तरुणाच्या अपहरणाची माहिती विश्रामबाग पोलिसांना कळताच त्यांनी कोणताही वेळ वाया न घालवता घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गाडीचा माग काढला. अखेर याच तपासात आरोपी गाडी घेऊन हा सिंहगड रोड परिसराच्या दिेशेने गेल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तत्परतेने सिंहगड रोड परिसरात सापळा रचून आरोपींची गाडी अडवली आणि प्रसाद सूर्यवंशीची सुखरुप सुटका केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number