1 मे रोजी पुण्यातील नसरापूर येथे चार वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमिवर नसरापूर प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने 14 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याची पोलिस कोठडी आज संपत असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हेही वाचा- Delhi Crime Case: राजधानी दिल्लीत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार
नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड होण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणात आजच दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आता न्यायालयीन प्रक्रियेकडे लागलं आहे.
या प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उसळली असून नसरापूर प्रकरणाची सुनावणी प्रभावीपणे आणि जलदगतीने करून आरोपीला लवकरात लवकरत शिक्षा करावी अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले असून न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.