मुंबई : ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, लेखक, आयपीएच आणि मुक्तांगणचे विश्वस्त डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन झाले आहे. ते 68 वर्षांचे होते. मुंबईतील परळ भागातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवार, 15 मे रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ नाडकर्णी यांच्या निधनाने त्यांचा मित्र परिवार, चाहतावर्ग यांनी दुःख व्यक्त केलं आहे. डॉ. नाडकर्णी हे इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (IPH) आणि मुक्तांगन डी-अॅडिक्शन सेंटरचे संस्थापक होते. त्यांचा सामुदायिक मानसिक आरोग्य उपक्रम, शैक्षणिक प्रशिक्षण, संशोधन आणि सर्जनशील योगदानात सक्रियपणे सहभाग असायचा.