बहुचर्चीत ‘इशकबाज’ मालिकेच्या सुपरवाईजिंग प्रोड्युसरची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई टीव्ही मालिकांचे निर्माते आणि कला दिग्दर्शक संजय बैरागी यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील राहत्या घराच्या इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरुन उडी मारुन 40 वर्षीय बैरागी यांनी त्यांच आयुष्य संपवलं. संजय बैरागी हे स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिक ‘इशकबाज’ चे सुपरवाईजिंग प्रोड्युसर होते. मुंबईतील मालवणी भागातल्या जनकल्याण नगरमधील सिलिकॉन व्हॅली इमारतीच्या […]

बहुचर्चीत ‘इशकबाज’ मालिकेच्या सुपरवाईजिंग प्रोड्युसरची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

टीव्ही मालिकांचे निर्माते आणि कला दिग्दर्शक संजय बैरागी यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील राहत्या घराच्या इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरुन उडी मारुन 40 वर्षीय बैरागी यांनी त्यांच आयुष्य संपवलं.

संजय बैरागी हे स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिक ‘इशकबाज’ चे सुपरवाईजिंग प्रोड्युसर होते. मुंबईतील मालवणी भागातल्या जनकल्याण नगरमधील सिलिकॉन व्हॅली इमारतीच्या 16 व्या मजल्यावरुन बैरागींनी उडी मारली.

आत्महत्या करण्यापूररर्वी त्यांनी सुसाईड नोच लिहीली होती. वैयक्तिक आयुष्यातील काही घटनांमुळे ते निराश होते, असं त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटवरुन स्पष्ट लिहील होत. त्यांना पत्नी आणि मुलगा आहे.

संजय बैरागींचा तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज सुरुवातीला व्यक्त केला जात होता. मात्र राहत्या घरी सापडलेल्या सुसाईड नोट सापडल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे.

शुक्रवारी संजय बैरागींनी कुटुंबीय आणि मित्रांसोबत धुलिवंदन साजरा केला होता. त्यानंतर दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ते घरी परतले होते. इतकंच नाही, तर त्यांनी धुलिवंदन साजरी केलेल्याचे फोटो सोशल मीडियावर देखील अपलोड केले. त्यानंतर एवढ टोकाचं पाऊल उचललं त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number