जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या हाती मोठं यश लागलं आहे. कुस्तीपटू प्रिया मलिक हिने हंगेरी येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं आहे. प्रिया मलिकने जागतिक कुस्ती स्पर्धेच्या ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. प्रिया मलिकने बेलारुसच्या कुस्तीपटूला ५-० ने पराभूत केलं आहे.
प्रिया मलिक ही हरियाणाच्या जींद जिल्ह्याची निवासी आहे. प्रियाने २०२० मध्ये नॅशनल स्कूल गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. याशिवाय गेल्या वर्षी पटनामध्ये झालेल्या राष्ट्रीय कॅडेट कुस्ती स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावलं होतं.
प्रियाने बेलारूसच्या कुस्तीपटूला 5-0 च्या फरकाने पराभूत करत हे सुवर्ण पदक मिळवलं आहे. प्रियाने २०१९ मध्ये पुण्यात खेलो इंडियामध्येही सुवर्ण पदक पटकावलं होतं.
प्रियाच्या या यशाबद्दल हरियाणाचे क्रिडामंत्री संदीप सिंग यांनी ट्विट करत तिचं अभिनंदन केलं आहे.
congratulations to the wrestler daughter Priya Malik of Haryana for winning the gold medal in the 73 kg category of the World Cadet Wrestling Championship in Budapest, Hungary. pic.twitter.com/cGVTvmfTUF — Sandeep Singh (मोदी का परिवार) (@flickersingh) July 25, 2021