Pune Crime: अजून एक हुंडाबळी! सासरच्यांच्या शारीरिक-मानसिक छळाला कंटाळून 5 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने जीवन संपवलं

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे साडेपाच महिन्यांच्या गर्भवती विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल झाला असून पती व सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Pune Crime: अजून एक हुंडाबळी! सासरच्यांच्या शारीरिक-मानसिक छळाला कंटाळून 5 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने जीवन संपवलं

पुणे: इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे सासरच्या कथित शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून २१ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे मृत महिला साडेपाच महिन्यांची गर्भवती होती. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पती आणि सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. सासूचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृत महिलेचे नाव सोनाली समाधान (कार्तिक) चंदनशिवे असे असून, तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली. या घटनेनंतर गुरुवारी रात्री इंदापूर पोलीस ठाण्याबाहेर नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

तक्रारीनुसार, सोनालीला लग्नानंतर सातत्याने माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात येत होती. ही रक्कम आणण्यासाठी तिचा पती, सासू आणि सासरे कथितपणे शारीरिक तसेच मानसिक छळ करत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून सोनालीने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याचा आरोप तिच्या वडिलांनी तक्रारीत केला आहे.

या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी आरोपी पती समाधान उर्फ कार्तिक गौतम चंदनशिवे आणि सासरे गौतम नामदेव चंदनशिवे यांना तातडीने ताब्यात घेत अटक केली आहे. तर आरोपी सासू पार्वती गौतम चंदनशिवे हिचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. विवाहितेच्या मृत्यूपूर्वी तिच्यावर नेमका किती काळ छळ सुरू होता, तसेच हुंड्याच्या मागणीसंदर्भातील इतर पुरावेही पोलिसांकडून तपासले जात आहेत.

दरम्यान, पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक आणि स्थानिकांकडून केली जात आहे. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली असून, तपासाच्या पुढील टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number