प्राजक्ताच्या आनंदाला उधाण

मुंबई, ३० जुलै २०२३, प्रतिनिधी : प्राजक्ता माळीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. तिने आता पर्यंत अनेक मालिका, सिनेमा, वेबसिरीजमध्ये काम केले आहे. त्यामुळे ती नेहमीच आपल्या चाहत्यांची मने जिंकत असते . अशातच ती नेहमीच आपल्या समाज माध्यमांवर सक्रिय असल्याने आपल्या आयुष्यातील दैनंदिन घडामोडी ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच प्राजक्ताने समाज माध्यमांवर एक पोस्ट […]

प्राजक्ताच्या आनंदाला उधाण

मुंबई, ३० जुलै २०२३, प्रतिनिधी : प्राजक्ता माळीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. तिने आता पर्यंत अनेक मालिका, सिनेमा, वेबसिरीजमध्ये काम केले आहे. त्यामुळे ती नेहमीच आपल्या चाहत्यांची मने जिंकत असते . अशातच ती नेहमीच आपल्या समाज माध्यमांवर सक्रिय असल्याने आपल्या आयुष्यातील दैनंदिन घडामोडी ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच प्राजक्ताने समाज माध्यमांवर एक पोस्ट करुन तिचा आनंद व्यक्त केलाय.

प्राजक्ताने गेल्या दोन वर्षात तिची बरीच स्वप्न करत आयुष्याचा यशस्वी टप्पा गाठला. यातीलच एक म्हणजे प्राजक्ताने लिहीलेल्या कवितांचा संग्रह “प्राजक्तप्रभा”. आज प्राजक्तप्रभाच्या दुसऱ्या आवृत्ती प्रकाशनाला २ वर्ष पुर्ण झाली. त्यानिमित्ताने प्राजक्ताने समाज माध्यमांवर पोस्ट करुन तिचा अनुभव सांगितला.

या पोस्टमध्ये प्राजक्ताने लिहिले,” “प्राजक्तप्रभा” दुसरी आवृत्ती प्रकाशनाला आज २ वर्ष पुर्ण झाली साहित्य परिषद, पुणे आठवणी (१ली आवृत्ती १९ जुलै २०२१…) जुलै २०२१ – जुलै २०२३ ह्या २ वर्षात “प्राजक्तत्रयी” पुर्ण…. हे post लिहीताना जाणवलं. आईशप्पथ देवाचीकृपा, तुमचा आशिर्वाद, बरीकर्म ह्याची फलश्रृती आणि काय…

हि पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांनी तसेच इतर कलाकारांनी तिचे कौतुक करायला सुरुवात केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number