मुंबई, १४ जुलै २०२३, प्रतिनिधी : छोट्या पडद्यावरील मालिका असो किंवा सुपरहिट मराठी सिनेमे असो अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नेहमीच आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकत असते. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्राजक्ता नेहमीच चर्चेत असते. आता ती पुन्हा चर्चेत आहे, मात्र यावेळी कारणसुद्धा खास आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची लाडकी निवेदिका प्राजक्ताने कर्जत येथे टुमदार असे फार्म हाऊस बांधले आहे. प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिची स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद व्यक्त केला. तिने तिच्या फार्म हाऊसच्या आवारातील काही फोटो देखील समाज माध्यमांवर सामायिक केले आहेत.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या ‘फार्म हाऊस’ परिसरातील फोटो सामायिक करताना प्राजक्ताने या घरासाठी घेतलेल्या कर्जाचाही उल्लेख केला. ती म्हणाली, ‘स्वप्न साकार, माझं स्वप्न असणाऱ्या फार्म हाऊसची आनंदी मालकीण. (डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे,एवढीच अट होती. अगदी मनासारखं घर मिळालं). प्राजक्ताने हे घर कर्जतमध्ये असल्याचं हॅशटॅग वापरुन सांगितलं. प्राजक्ताची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी आणि इतर कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.